शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दांडी-वायरी किनार्‍यावर ७० टन मासळी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:12 IST

मालवण : ओखी वादळाच्या तडाख्यात कोकण किनारपट्टीतील मच्छिमार नौका व जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन हंगामात कोसळलेल्या अस्मानी संकटाला सामोरे जाणाºया आणि नुकसानीमुळे चिंताग्रस्त दर्याराजासाठी सध्या एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ओखीच्या तडाख्यानंतर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारीसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, छोट्या मच्छिमारांना तारण्यासाठी ‘तारली’ मासळी धावून आली ...

मालवण : ओखी वादळाच्या तडाख्यात कोकण किनारपट्टीतील मच्छिमार नौका व जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन हंगामात कोसळलेल्या अस्मानी संकटाला सामोरे जाणाºया आणि नुकसानीमुळे चिंताग्रस्त दर्याराजासाठी सध्या एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ओखीच्या तडाख्यानंतर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारीसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, छोट्या मच्छिमारांना तारण्यासाठी ‘तारली’ मासळी धावून आली आहे.दांडी-वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीच्या जाळ्यात अपेक्षेपेक्षा जास्त अशी तब्बल ७० टन मासळी सापडली. यामुळे दांडी-वायरी किनारपट्टीवर तारली मासळीचा खच पडला होता. ती एकत्र करून निर्यात करण्याचे काम रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पारंपरिक मच्छिमारांच्या रापणीत मासळी मिळत असल्याने मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.दांडी-वायरी परिसरात तोडणकर यांचा पारंपरिक रापण संघ आहे. याच रापण संघाला ओखी वादळाचा मोठा तडाखा बसला होता. यात रापणीच्या नौकेचे नुकसान झालेच शिवाय जाळीही तुटून गेल्याने रापण संघावर मोठे संकट ओढवले होते. त्यानंतर आठवडाभर बंद असलेली मासेमारी दोन दिवसांपासून पूर्वपदावर येत आहे. दांडी येथील समुद्रात नारायण तोडणकर रापण संघाने शनिवारी रात्री जाळी मारली होती. त्यानंतर रविवारी सकाळी जाळी ओढताना अनपेक्षित तारली मासळी जाळ्यात सापडून आल्याने मच्छिमारांना आश्चर्याचा धक्काच बसला. एक-एक करता करता १०० खंडीपेक्षा जास्त मासळी तुळस-वेंगुर्ले येथील आकाश फिश मिल येथे निर्यात करण्यात आली. यावेळी समुद्रकिनाºयावर मासळी वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पर्यटकांनी बंपर तारलीचा आनंद लुटला.किनारपट्टीवर दूरवर पसरला मासळीचा खचनारायण तोडणकर रापण संघाला संकटातून मार्ग काढण्यासाठी निसर्गच धावून आला. नुकसानग्रस्त रापण संघाला निसर्गाने रविवारी भरभरून तारलीची देणगी देत कोसळलेल्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न केला. वायरी किनारपट्टीवर लावण्यात आलेल्या रापणीत १०० खंडीपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे ७० टनपेक्षा जास्त तारली मासळी मिळाली. काही किलोमीटर लांब असलेल्या रापणीचे जाळे मासळीने तुडुंब भरून गेले. तरीही वाहून जाणारा मासळीचा खच किनारपट्टीवर दूरवर पसरला होता.